जी. एच. रायसोनीत युवा महोत्सव “कश्ती” ची धूम

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाचा “कश्ती” हा वार्षिक दोन दिवसीय स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. ‘भारतातील संस्कृती’ या विषयावरील कार्यक्रम सादर झाले तसेच गुणीजन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील स्कूल ऑफ मॅनेजमेटचे संचालक प्रा. डॉ. अनिल डोंगरे, नवकार इन्वेस्टमेंटचे संचालक सौरभ जैन, रायसोनी इस्टीट्यूटचे ऍडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी व एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी रायसोनी इस्टीट्यूट गेली अनेक वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करीत असून या इस्टीट्यूट मधून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदावर आहेत. सध्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी इस्टीट्यूटचे व आपल्या शहराचे नाव उज्ज्वल करावे असे मत व्यक्त करत या स्नेह संमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धा व कार्यक्रमाची माहिती दिली तसेच त्यांनी विदयार्थ्यांना यावेळी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. ता.७ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित या स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये मोह मोह के धागे, मेरे कॉलेज की लडकी, झिंग झिंग झिंगाट, एक राधा एक मीरा, राधा ही बावरी, नवरी नटली, तनहाई तनहाई, अच्छा चलता हू दुवाओ मे याद रखना, अशी विविध बहारदार गीतांवर नृत्य व गायन स्पर्धेत स्पर्धकांनी बहारदार सादरीकरण केले. यावेळी स्पर्धक व प्रेक्षक विद्यार्थ्यांनी एकच ठेका धरला.

आपल्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळविली. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातून नृत्य, गीत गायन, कल का नायक, अंताक्षरी, फेस पेंटिंग, रांगोळी, पोस्टर सादरीकरण या विविध स्पर्धांमध्ये ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयामध्ये सुरु असलेल्या विद्यापीठस्तरीय युवा महोत्सव कश्ती २०२३ या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी रॅम्प वॉक, केस स्टडी, मॅड-अॅड शो या स्पर्धा जल्लोषात पार पडल्या. समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रायसोनी इस्टीट्यूटचे कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल उपस्थित होते.

पोस्टर सादरीकरण स्पर्धेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनेक सामाजिक विषयांशी निगडीत पोस्टर सादर केले. बिजनेस प्लॅन या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी व्यवसाय व्यवस्थापनातील जी.एस.टी, मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन रिसोर्स आदी विषयांवर सखोल चर्चा केली. कार्पोरेट जगतात पाउल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून चुरशीने स्पर्धा खेळल्या. विध्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास साध्य व्हावा, सादरीकरण कौशल्य विकसित व्हावे, सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती जाणीव निमार्ण व्हावी या उद्देशाने ह्या स्पर्धा घेण्यात आले होते. नृत्य व गायन स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रा.रफिक शेख, नावीद शेख, प्रा.लोकेश साळुंखे, प्रा.मोनाली शर्मा, प्रा. सोनल पाटील रायसोनी शार्क टॅक या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. युवराज परदेशी, सौरव जैन व प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी तर मॅड-अॅड शो स्पर्धेचे राहुल मेहरा, गणेश पाटील व डॉ. प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी, बोर्ड रूम बॅटल स्पर्धेसाठी डॉ. शुभदा कुलकर्णी, पोस्टर प्रेझेटेशन स्पर्धेसाठी प्रा. मुकुंद पाटील व प्रा. रफिक शेख तसेच रॅम्प वॉक स्पर्धेसाठी शलाका वाघन्ना, निरंजन देशमुख व दीपा कक्कड यांनी परीक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल त्रिवेदी यांनी केले. तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी “कश्ती” या वार्षिक स्नेहसंमेलनाचे समन्वय स्टुडंट कोंसीलच्या विध्यार्थ्यानी व सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

महाविद्यालयात रंगला “फॅशन शो” व “पर्सनॅलिटी कॉन्स्टेंट”

येथील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात सर्व विभागांच्या अंतर्गत “फॅशन शो तसेच पर्सनॅलिटी कॉन्स्टेंट २०२३” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाश्चिमात्य देशातील आणि भारतातील आजच्या काळाला अनुसरून विद्यार्थ्यांनी फॅशन शो मध्ये वेगवेगळ्या थीमवर वस्त्र परिधान करून रसिकांची मने जिंकली. यामध्ये इंडो वेस्टर्न, वेस्टर्न, रेनबो थीम, पारंपारिक, बॉलीवूड, पुष्पा टाॅलीवूड इत्यादी विविध पद्धतीच्या ड्रेसमधील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन करून मनोवेधक सादरीकरण केले. तसेच पर्सनॅलिटी कॉन्स्टेंटमध्ये परीक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नाची स्पर्धकांनी अचूक उत्तरे देत आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत आपल्यात असलेल्या विविध कलागुणांचे सादरीकरण देखील यावेळी स्पर्धेत केले. रसिक विद्यार्थ्यांनी या “फॅशन शो”ला भरभरून प्रतिसाद देत आनंद लुटला.

हे ठरले “रेडिअन्ट शो” व “पर्सनॅलिटी कॉन्स्टेंट” चे हिरो

यावेळी स्पर्धेत इंट्रोडक्शन, टॅलेन्ट व परीक्षकांचे प्रश्न अशा आशयांच्या तीन फेऱ्या घेण्यात आल्या या अनुषंगाने मिस्टर जी. एच. रायसोनी विवेक पाटील तर मिस जी. एच. रायसोनी कांचन माळी यांना यावर्षीचा रेडिअन्ट शो सर्वोत्कृष्ट किताब देण्यात आला. तसेच बेस्ट वॉक – महेश देसले, बेस्ट स्माईल – स्नेहा रावलानी, बेस्ट अटायर- सिमरन चावला, परीक्षक विशेष निवड- निसर्ग कासार यांना या टायटलचे पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले.

यांनी मिळवली विविध स्पर्धेत पारितोषिके

बिजनेस प्लॅन स्पर्धेत प्रथम- कीर्तीराज श्रीश्रीमाल, द्वितीय – कुणाल रायसिंघानि, स्वर सम्राट सांघिक स्पर्धेत प्रथम- मिलित आणि ग्रुप, द्वितीय – अनिकेत आणि ग्रुप, तृतीय- तन्वी व ग्रुप, स्वर सम्राट वैयक्तिक स्पर्धेत प्रथम- प्रणव इखे, द्वितीय – धवल वायकोळे, तृतीय- योगेश माळी, सांघिक नृत्य स्पर्धेत प्रथम- लक्ष्मी शेलार आणि ग्रुप, द्वितीय – साक्षी पोहानी आणि ग्रुप, तृतीय- सिमरन चावला व ग्रुप, नृत्य स्पर्धेत प्रथम- हेमांगी निकम, द्वितीय – लक्ष्मी मंधान, तृतीय- वैष्णवी, मॅड-अॅड शो सांघिक स्पर्धेत प्रथम- जायद तांबोळी आणि ग्रुप, द्वितीय – यश लढढा आणि ग्रुप, तृतीय- अर्पित शुक्ला व ग्रुप, बोर्ड रूम बॅटल स्पर्धेत प्रथम- मेहक व नवीन साहित्या, द्वितीय – हर्षित जैन आणि सुदर्शन जैन, तृतीय- यश लढढा व कांचन माळी, पोस्टर प्रेझेटेशन स्पर्धेसाठी प्रथम- उमर शेख आणि ग्रुप, द्वितीय – अरुणा मायटी, तृतीय- अनिकेत महाजन व ग्रुप तसेच वयेक्तिक पोस्टर प्रेझेटेशन स्पर्धेसाठी शुभम परदेशी या विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले.

Leave A Reply

Your email address will not be published.