रावेर येथे महिलेचा विनयभंग

0

रावेर;- तालुक्यातील तामसवाडी येथे घरात एकटे असलेल्या महिलेचा हात पकडून मला तू खूप आवडतेस असे म्हणून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तामसवाडी येथे 21 वर्षे विवाहिता आपल्या पतीसह राहत असून ती सहा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता घरात एकटी असताना आरोपी सागर उर्फ विजय दिलीप कोचुरे वय 23 राहणार तामसवाडी याने घराचा दरवाजा ठोठावल्याने फिर्यादी विवाहितेने दरवाजा उघडला असता त्याने तिचा हात पकडून मला तू खूप आवडतेस असे सांगून तिच्याशी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला . त्यामुळे विवाहितेने लागलीच धाव घेऊन पोलीस स्टेशन गाठून आरोपी सागर कोचुरे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.