भा.क.प, किसान सभा, शेतमजूर युनियनतर्फे रास्ता रोको…

0

 

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शिरपूर चोपडा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ते विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु दहिवद फाटा ते अनेर नदी पुलापर्यंत खड्यांचे साम्राज्य आहे. वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास होतो व अपघातामुळे जीवाला मुकावे लागते. त्याठिकाणी पक्के फरशीचे काम होने अपेक्षित आहे. सामान्य बांधकाम विभागाचे लक्ष वेधून देखील, वारंवार पडणाऱ्या खड्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होतं आहे. त्यामुळे शिरपूर चोपडा रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे व्हावे. तसेच मुदतीत रस्ता खराब होऊन देखील काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, व त्वरित खड्डे बुजविण्यात येऊन, शासनाच्या मंजूर निधीचा पुरेपूर उपयोग होऊन इस्टीमेट प्रमाणे काम व्हावे. अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

वरील मागण्यांच्या संदर्भात दि.3 ऑक्टोबर रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा, धुळे जिल्हा लालबावटा शेतमजूर युनियन मार्फत शिरपूर चोपडा. यांचेकडून राज्य महामार्गावर तरडी गावाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या गाडीचा ताफा रोखण्यात आला. व गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले, पालकमंत्री महाजन यांनी निवेदनाची दखल घेऊन संबंधित विभागाच्या जिल्हा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना मोबाईल द्वारे संपर्क करून तातडीचे उपायोजना करण्याचे आदेश दिले.

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ऍड.हिरालाल परदेशी, शिरपूर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी, ऍड.संतोष पाटील, धुळे जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड डॉ. किशोर सूर्यवंशी, धुळे जिल्हा भाकप सेक्रेटरी वसंत, अर्जुन कोळी,  मा.राज्य कौशल सदस्य साहेबराव पाटील,  शिलदार पावरा, सुरजमल जैन, जितेंद्र देवरे, सचिन थोरात, कवर लाल कोळी, कमलाकर पाटील, कैलास पाटील, रवींद्र पाटील, भरत सोनार, तुळशीराम पाटील, कावा पावरा, योगेश पावरा, बापू अहिरे, हरचंद पावरा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

या मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.

1) शिरपूर चोपडा रस्ता त्वरीत दुरुस्ती होऊन रुंदीकरण व्हावे.

2) तरडी गावालगत जगन्नाथ एकनाथ पाटील यांच्या शेतालगत असलेल्या अपघातस्थळ रस्त्यात पुल बांधावा.

3) सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तरडी गावात जुनी ग्रामपंचायत पासून रस्त्यालगत गटारीचे काम करण्यात यावे.

4) शिरपूर चोपडा रस्ता व बभळाज ते होळनाथें रस्ता खराब होऊन देखील मुदतीत रस्त्याचे काम न करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल व्हावेत व त्याची चौकशी व्हावी.

5) धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी.

6) खरीप हंगामातील कापूस इत्यादी पिकांची नुकसान भरपाई विमा कंपनीने पंचनामे करून पंचवीस टक्के रक्कम त्वरित द्यावी.

7) पिक कर्जदार शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने सरसकट पन्नास हजार रुपये द्यावेत.

8) बँक ऑफ महाराष्ट्र शाखा येथे शेतकऱ्यांना पीक कर्जाची मंजुरी शाखेतच द्यावी व त्वरित कर्ज द्यावे.

9) हिसाळे सजा येथील तलाठी कार्यालय सुरू करण्यात येऊन तलाठी यांनी हिसाळे येथे सजेचे कामकाज करावे.

10)  संजय गांधी कार्यालयातून वृद्ध, निराधार, विधवा, अपंग यांना त्वरित निधीचे वाटप करण्यात यावे.

11) तरडी येथील शिवबारी पाडा आदिवासी वस्तीतील रहिवाशांना त्वरित डीपी बसून विजेची व्यवस्था करावी.

12) तोंदे, हिसाळे, तरडी, बभळाज गावातील एलटी लाईनचे तार त्वरित बदलण्यात यावे विजेचे नूतनीकरण करण्यात यावे.

13) घरगुती ग्राहकांना अवास्तव येणारे वीज बिल कमी करण्यात यावे.

Leave A Reply

Your email address will not be published.