गुवाहाटी, लोकशाही न्यूज नेटवर्क:
टीम इंडिया (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात गुवाहाटीमध्ये (Guwahati) खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 (T-20I) आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान, गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये अचानक काहीतरी घडले, ज्यामुळे सामना काही काळ थांबला. दरम्यान, सोशल मीडियावर खळबळ माजली होती, असून सामना थांबवण्याचे कारण समोर आले आहे. वास्तविक, स्टेडियममध्ये सामन्यादरम्यान खेळपट्टीवर एक साप रेंगाळताना दिसला, त्यानंतर सामना थांबवण्यात आला आणि साप हटवल्यानंतर दुसऱ्याच क्षणी सामना पुन्हा सुरू करण्यात आला. त्याचवेळी, खेळपट्टीवर साप रेंगाळतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/Himansh81934200/status/1576579308256387072?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1576579308256387072%7Ctwgr%5Eb49a74fdbcbb5805cdb297a0b41b509784966fb4%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fzara-hatke%2Fsnake-spotted-on-field-as-play-interrupted-in-guwahati-t20i-india-vs-south-africa-2nd-t20-snake-on-the-ground-in-barsapara-cricket-stadium-guwahati-3398349
रविवारी रात्री गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. खरंतर, ज्यावेळी रोहित शर्मा आणि केएल राहुल जबरदस्त बॅटिंग करत होते, त्याचवेळी मैदानात एक साप फिरत होता. साप मैदानात उतरण्यापूर्वी केएल राहुलने 15 चेंडूत 33 धावा केल्या होत्या. त्याच क्रमात रोहित शर्माने 27 चेंडूत 31 धावा केल्या होत्या.
या सापाने (Snake) मैदानात (Ground) प्रवेश करताच भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये घबराट पसरल्याचे सांगितले जात आहे. यावेळी क्षेत्ररक्षकांची (Fielder) नजर त्याच्यावर पडली आणि वेळीच कर्मचाऱ्याने सापाला बाहेर काढले, त्यानंतर थांबलेला सामना पुन्हा सुरू झाला. तसे, गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये अशी परिस्थिती निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही एकदा आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान कव्हर असतानाही पावसाचे पाणी खेळपट्टीवर गेले होते.