घरच्या घरी बनवा रसमलाई केक

0

खाद्यसंस्कृती विशेष

आता तुम्ही देखील घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रसमलाई केक बनवू शकतात. चला तर पाहूया रसमलाई केकची रेसिपी..

साहित्य: 

२०० ग्रॅम मैदा

रेडिमेड रसमलाई

१ वाटी कंडेन्स्ड मिल्क

१/३ चमचा बेकिंग पावडर

चिमूटभर सोडा

१ चमचा तेल

व्हॅनिला इसेन्स

विप क्रिम

पाणी

५० ग्रॅम पिठीसाखर

बटर

टिश्यू पेपर

 

कृती:

१. मैदा आणि सोडा, बेकिंग पावडर, पिठीसाखर एकत्र करून २ ते ३  वेळा चाळून घ्यावे.

२. त्यात कंडेन्स्ड मिल्क, १ चमचा तेल, वेनिला इसेन्स, २ टे.स्पून पाणी लागेल तेवढेच घालून ब्लेडंरने १०. मि. ब्लेंड करून घ्या.

३. केक भांड्यात मिश्रण काढून मिश्रण १८० डिग्रीवर २५  मिनिट मायक्रोवेव्हमध्ये ठेवून केक बेक करून घेऊन थंड झाल्यावर ३ लेयर कापून घ्या.

४. १ लेयर वर रसमलाई मधलेच दुध सगळीकडे लावून घेऊन त्यावर विप क्रिम लावून घ्यावे.

५. तसेच २ लेयर ह्याच पद्धतीत लावून केक वर डिझाइन करा.

६. रसमलाई वरती ठेवून सजावट करून घेऊन २ तास फ्रिज मधे ठेवून सेट करून घेऊन थंड झाल्यावर कापून घ्या.

टिप्स

• पिस्ता असेल तर वरून व बाजूला लावून घ्या. केक भांड्यात टिश्यू पेपर लावून मिश्रण टाकून नंतर  बेक करून घ्या.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर

९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.