गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पेटवली वाहने, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हिदूर-दोबुर-पोयारकोटी या रस्त्याच्या कामासाठी आणलेले तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी नक्षलवाद्यांनी जाळून टाकले आहे. घटनास्थळी २२ डिसेंबरचा भारत बंद यशस्वी करा असे हिंदीमध्ये पत्रक आढळून आले आहे.

भामरागड तालुक्यातील हिदूर-दोबुर-पोयारकोटी या रस्त्याचे बांधकाम मागील काही दिवसांपासून सुरु आहे. या कामासाठी मंगळवारी रात्री हिदूर गावात वाहने ठेण्यात आली. या गावात नक्षलवादी आले, त्यांनी तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबीच्या आग लावली. त्यामुळे चारही वाहने जाळून खाक झाली. त्यामुळे कंत्राटदाराचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळी पत्रक टाकले. या पत्रकात २२ डिसेंबर को भारत बंद सफल बनाओ असे आवाहन त्यांनी हिंदी भाषेत लिहिल्याचे दिसून येत आहे.

बदला सप्ताह
एका प्रवक्त्याच्या माहितीनूसार देशातील ४० टक्के खनिजे झारखंडमध्ये आहेत. ज्याची वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांकडून लूट करण्यात येत आहे. या लुट विरोधात आम्ही क्रांतिकारी चळवळ चालवत आहोत. त्यामुळे या कंपन्यांना खनिजांची लूट करता येत नाही. अशा स्थितीत भाजप सरकारच्या सहकार्याने क्रांती आंदोलन होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींच्या अनुषंगाने बदल सप्ताहाचे आयोजन काण्यात आले आहे. या हल्ल्यांच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने 16 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत बदला सप्ताह साजरा करण्याची घोषणा केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.