रश्मिका मंदानाच्या डिपफेक व्हिडिओवर सरकारचा मोठा निर्णय
दोषींना ३ वर्षांचा कारावास आणि १ लाखांचा दंड
लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या सोशल मीडियावर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक डिपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रश्मिका मंदानाचा व्हिडिओ समोर येताच खुद्द रश्मिकापासून ते अमिताभ बच्चनपर्यंत सर्वानी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत व्हिडिओ एडिट करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. आता थेट केंद्र सरकारने या घटनेची दाखल घेतली आहे.
या प्रकरणात शासनानं माहिती व तंत्रज्ञान अॅक्ट २००० च्या ६६ डी नुसार संगणकाच्या मदतीनं एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्यास होणारी कारवाई. अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूद्वारे केलेला प्रयत्न ज्यामुळे संबंधित व्यक्तीची प्रतिमा फोटो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून मलिन केली जाईल अशा लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. सोबतच दोषीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.
प्रत्यक्षात या व्हिडिओची तपासणी केली असता तो ब्रिटिश इंडियन इन्फ्ल्युंसर झारा पटेलचा असल्याचे दिसून आले. तो व्हिडिओ तंत्रज्ञानाच्या मदतीनं मॉर्फ करण्यात आला होता. पटेलच्या जागी रश्मिकाचा फोटो वापरण्यात आला होता. रश्मिकाची प्रतिक्रियाही यावर समोर आली आहे. तिने आपण जेव्हा हा षटकार पहिला तेव्हा खूपच घाबरून गेली आणि त्यातून तिला फार मोठा धक्का बसल्याचे तिने म्हंटले आहे.
हे जे काही समोर आले आहे, त्यामुळे मी खूपच दुःखी झाली आहे. अशा प्रकारे जर व्हिडिओ समोर येत असतील तर त्यावर आपण कशाप्रकारे कारवाई करणार आहोत. असा प्रश्न समोर आला आहे. मी केवळ माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या सारख्या अजून कित्येकजणी असतील ज्यांच्याबाबतीत हा प्रकार घडला असेल किंवा घडेल त्यांनी काय करावे, त्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही, असेही रश्मिकानं विचारले आहे.