नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
विप्रो ही देशातील चौथी सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी असून 15 नोव्हेंबरपासून विप्रो कर्मचाऱ्यांना हायब्रीड वर्क पॉलिसी लागू करणार आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान 3 दिवस कार्यालयात यावे लागणार आहे. यापूर्वी टीसीएस आणि इन्फोसिसनेही कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ धोरण जाहीर केले होते.
https://x.com/chandrarsrikant/status/1721504802511990959?s=20
टीसीएसने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस कार्यालयात येणे बंधनकारक केले आहे, तर इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना महिन्यातून 10 दिवस कार्यालयात येण्यास सांगितले आहे. विप्रोचे एचआर अधिकारी सौरभ गोविल यांनी मेलमध्ये म्हटले आहे की, ’15 नोव्हेंबरपासून सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात यावे लागेल.
या बदलाचा उद्देश टीमवर्कला चालना देणे, एकमेकांमध्ये अधिक संवादासाठी वाव निर्माण करणे आणि विप्रोची संस्कृती मजबूत करणे हा आहे.’ याव्यतिरिक्त, विप्रोने कर्मचार्यांना इशारा दिला आहे की जर त्यांनी नवीन हायब्रिड वर्क पॉलिसीचे पालन केले नाही तर त्यांना 7 जानेवारी 2024 पासून कारवाईला सामोरे जावे लागू शकते.