दुर्मीळ ! अर्धा नर, अर्धी मादी असलेला पक्षी..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

निसर्गाची किमया अनोखी आहे. या निसर्गात अनेक अनोखे जीव जंतूंचा समावेश आहे. या प्राणी पक्षांमध्ये प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि रचना वेगळी असते. प्रत्येक प्रजातीमध्ये नर आणि मादी असतात. मात्र पक्ष्यांच्या व प्राण्यांच्याही काही प्रजातींमध्ये ‘गायनँड्रोमॉर्फ’ आढळतात. हे जीव अर्धा नर आणि अर्धी मादी असतात. असाच हा अत्यंत दुर्मीळ असा पक्षी आहे.

या पक्षाच्या एका बाजूला नराप्रमाणे काळे आणि मोठे पंख आहेत. तर दुसर्‍या बाजूला मादाप्रमाणे तपकिरी आणि पिवळ्या रंगाचे पंख आहेत. या पक्षाच्या छातीवर ठिपके नाहीत, हे मादी असल्याचे लक्षण आहे. विशेष म्हणजे या पक्षामध्ये मादीप्रमाणे अंडाशय देखील आहे.

64 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पाऊडरमिल एविएशन रिसर्च सेंटरमध्ये अशाच प्रकारचा पक्षी सापडला होता. या पक्षामध्ये मादीप्रमाणे अंडाशय आहे. यामुळे हा पक्षी अंडी घालून पिलांना देखील जन्म देऊ शकतो. उत्तर अमेरिकेत कार्डिनल पक्ष्यांमध्ये असा प्रकार अधिक आढळतो. त्याला ‘हाफ सायडर्स’ असेही म्हटले जाते. एकाच अंड्यात दोन केंद्रके असतील व त्यामध्ये प्रत्येकी ‘झेड’ व ‘डब्ल्यू’ गुणसुत्रे असतील तर अशा प्रकारचा जीव निर्माण होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.