एप बेस्ड बाईकवरून कस्टमरने पेट्रोल संपल्यानंतरही उतरण्यास दिला नकार; ढकलून नेताना व्हिडीओ व्हायरल…

0

 

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक विचित्र घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे पेट्रोल संपल्यानंतर एका कस्टमरने एप बेस्ड बाईकवरून उतरण्यास नकार दिला. व कस्टमर बाईकवर बसलेला असताना चालकाने बाईक पेट्रोल पंपावर नेण्यासाठी धक्का मारला. दरम्यान रस्त्याने हा प्रकार घडत असतांना कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवला आणि पोस्ट देखील केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील रॅपिडोच्या एका कस्टमरने बाईकचं बुकिंग केलं होतं. बुकिंगनुसार, बाईक चालवणाऱ्या व्यक्तीने कस्टमरला इच्छित स्थळी नेण्यास सुरुवात केली, परंतु अर्ध्या रस्त्यात गेल्यावर बाईक मधील पेट्रोल संपलं. पेट्रोल संपल्यावर पेट्रोल पंपाकडे जाण्यासाठी बाईक चालकाने खाली उतरण्यासाठी कस्टमरला विनंती केली. मात्र त्याने बाईकवरून खाली उतरण्यास सपशेल नकार दिला.

त्यानंतर चालकाने बाईक ढकलण्यास सुरुवात केली. दोघेही त्याच पद्धतीने जवळच्या पेट्रोल पंपावर पोहोचले. बाईकच्या मागे असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हि़डीओ काढला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.