बोअरवेलमध्ये पडलेल्या मोनाचा मृतदेह बाहेर काढला; सात दिवसांपूर्वी पडली होती…

0

 

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

गंगापूर शहर जिल्ह्यातील बामनवास परिसरातील रामनगर धोसी गावात कच्च्या बोअरवेलमध्ये पडलेल्या महिलेचा मृतदेह अखेर ७ दिवसांनंतर NDRF आणि SDRF च्या टीमने बाहेर काढला आहे. यानंतर गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेले बचावकार्य संपले आहे. बचाव कार्य अंतिम टप्प्यात अत्यंत गुंतागुंतीचे बनले होते, त्यामुळे बचाव कार्य पथकाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.

बोअरवेलमध्ये महिलेचा मृतदेह 90 फूट खोल अडकला होता. प्रशासनाने महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला असून तेथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

अहवालानुसार, कच्च्या बोअरवेलजवळ खोदलेल्या 100 खोल समांतर खड्डयातून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. मात्र, खोदकाम सुरू असताना प्रथम खड्डे पाण्याने भरल्याने बचाव पथकाला बोअरवेलपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते.

विशेष म्हणजे बोअरवेलमधून महिलेला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमने मशीनच्या सहाय्याने 100 फूट खोदले, मात्र खोदलेल्या खड्ड्यात पाण्याचा जोरदार प्रवाह असल्याने बचावकार्य कठीण झाले. खड्डे पाण्याने भरल्यामुळे बचाव पथकासाठी बोअरवेलपर्यंत बोगदा करणे मोठे आव्हान बनले होते, परंतु बचाव पथकाने अथक परिश्रम सुरूच ठेवल्याने महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

Leave A Reply

Your email address will not be published.