विकृतीचा कळस.. पाळीव कुत्रीवर वृद्धाकडून अनैसर्गिक अत्याचार

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. समाजातून अनेक विकृत समोर येत असतात. मात्र ही घटना विकृतीचा कळस घटणारी आहे. पाळीव  कुत्रीवर एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील टाकळकरवाडी या गावात घडली आहे. भिवसेन धोंडीबा टाकळकर (रा. टाकळकरवाडी ता. खेड) असं कुत्रीवर अत्याचार करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी या वृद्धावर गुन्हा दाखल केला असून या विकृताला अटक देखील करण्यात आली आहे.

अत्याचाराचे व्हिडीओ चित्रण

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वृद्ध व्यक्ती हा कुत्रीवर सतत अत्याचार करत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे गावातील लोकांनी हा वृद्ध कुत्रीवर अत्याचार करत असताना कॅमेऱ्यात कैद करण्याचे ठरवले. त्यानुसार वृद्धावर पाळत ठेवली गेली. वृद्ध पाळीव कुत्रीवर अत्याचार करतानाचा घाणेरडा प्रकार अखेर कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळकरवाडी गावात हा प्रकार घडला आहे. ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे.

घरामध्ये नेऊन अनैसर्गिक अत्याचार 

दरम्यान, खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात येथे भिवसेन टाकळकर राहतो. त्याचे वय ६५ आहे. भिवसेन यांनी अनेकदा पाळीव कुत्रीवर अत्याचार केले असल्याचे उघड झाले आहे. ते राहत्या घरात पाळलेल्या कुत्रीस खायचे आमिष दाखवून बोलावून घ्यायचे आणि तिला घरामध्ये नेऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचे. भिवसेन करत असलेले कृत्य हे शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आले होते. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला. ज्येष्ठ नागरिकाने असे कृत्य केल्यामुळे सगळेच हैराण झाले होते. त्यामुळे या तरुणांनी याबाबत एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्राणी मित्रांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील वृद्ध भिवसेन यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक देखील केली आहे.

गुन्हा दाखल 

पोलिसांनी आयपीसी कलम ३७७ (अप्राकृतिक गुन्हे) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नवनाथ रानगट करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.