भाषण सुरु असतांना चिडले रावसाहेब दानवे, कार्यकर्त्यास काढले सभेतून बाहेर

0

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे भाषण सुरु असतांना कार्यकर्त्यांनी गोंधळ केल्यामुळे रावसाहेब दानवे चांगलेच संतापलेले बघायला मिळाले. जालन्यातील एका कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली असून दानवेंनी त्या हसणाऱ्या कार्यकर्त्याला भर सभेत जाब विचारत बाहेर निघून जायला सांगितले. या घटनेची सध्या जालन्यामध्ये चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) सध्या जालन्यामध्ये आहेत. जालन्यामध्ये पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कर्ज वाटपाच्या कार्यक्रमाल ते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना ते लाभार्थ्यांना योजनेचे महत्व समजून सांगत होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या विविध योजनांचीही माहिती उपस्थितांना देत होते. एकीकडे रावसाहेब दानवे यांचे भाषण सुरू असताना दुसरीकडे एक कार्यकर्ता शेजारी बसलेल्या व्यक्तीसोबत चर्चा करत हसत होता.

ही बाब त्यांच्या लक्षात येताच दानवेंनी त्या कार्यकर्त्याला हसण्याचा जाब विचारला.आणि संतापून त्याला तू लाभार्थी आहे का.? असा प्रश्न विचारला. तसेच त्याला उठून जायला सांगितले. दरम्यान रावसाहेब दानवे विविध योजनांची माहिती समजावून सांगत असताना त्यांना इतर लोक डिस्टर्ब होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ते चांगलेच संतापले. या घटनेची सध्या तरी चांगलीच चर्चा रंगली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.