न्यूड फोटोशूट भोवले; रणवीर सिंहवर गुन्हा दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

न्यूड फोटोशूट (Nude photoshoot) करणे अभिनेता रणवीर सिंहला (Ranveer Singh) चांगलेच महागात पडलेले दिसतेय. या न्यूड फोटोशूटची जोरदार चर्चा रंगतांना दिसत आहे. अखेर या प्रकरणी रणवीरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर पोलीस ठाण्यात (Chembur Police Station) हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भारतीय संस्कृतीचं उल्लंघन केल्याचा आरोप करत तसेच महिलांच्या भावना दुखावल्याचं सांगत एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारत हा संस्कृतीचे जतन करणारा देश आहे. या देशातील प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतात अभिनेत्याला ‘नायक’ असे म्हटले जाते. चाहते त्यांच्या लाडक्या कलाकाराला फॉलो करत असतात. त्यामुळे रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट करू नये, असे रणवीर विरुद्ध गुन्हा दाखल केलेल्या स्वयंसेवी संस्थेचे मत आहे. तसेच अनेक लोकांनी यावर टीका केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.