मोठी बातमी.. राहुल गांधींसह अनेक खासदारांना घेतले ताब्यात

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ताब्यात घेतले आहे. गांधी हे दिल्लीच्या विजय चौक (Delhi Vijay Chowk) येथे काँग्रेस खासदारांसोबत आंदोलन करत होते. यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची आज ईडीची (ED) चौकशी सुरु आहे.  या चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते देशभरात सत्याग्रह करत आहेत.

काँग्रेसचे सर्व खासदार संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत निषेध मोर्चासाठी जात होते, त्यांना दिल्ली पोलिसांनी रोखले आहे. यापूर्वी, नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald Case) 21 जुलै रोजी सोनिया गांधी यांची चौकशी करण्यात आली होती. तसेच काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी आरोप केला की, दिल्ली पोलीस काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना राजघाटावरही जाऊ देत नाहीत. आम्हाला निदर्शने करण्यापासून रोखले जात आहे. यादरम्यान कार्यालयाबाहेर महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे फुगे फोडून निषेध व्यक्त केला.

काँग्रेस मुख्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनामुळे निदर्शने करण्यास मनाई करत मुख्यालयाबाहेर कलम 144 लागू करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.