मुलगी आणि जावयाची हत्या ; खुनी बापाचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण…

0

 

चेन्नई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

तामिळनाडूमध्ये कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याच्या कारणावरून एका नवविवाहित जोडप्याची महिलेच्या वडिलांनीच हत्या केल्याची घटना घडली आहे. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याने नवविवाहितेचे वडील तिच्यावर नाराज होते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. थुथुकुडी जिल्ह्यातील तुतीकोरीन या बंदर शहरातून ही घटना घडली आहे.

दरम्यान या जोडप्याचे लग्न झाल्यानंतर, मुलीच्या कुटुंबाने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती ज्यानंतर या जोडप्याने मदुराई पोलिसांसमोर हजर झाले आणि दावा केला की ते दोघेही प्रौढ आहेत आणि त्यांनी स्वतःच लग्न केले आहे.  या जोडप्याने स्टेशनवरून व्हिडिओ कॉलवर मुलीच्या पालकांशी देखील बोलले, त्यांनी कधीही पोलिस संरक्षण मागितले नाही. असे तुतीकोरीनमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी बालाजी सरवणन यांनी सांगितले. दरम्यान गावातील वडिलधाऱ्यांनीही मध्यस्थी करून कुटुंबीयांना त्रास न देण्यास सांगितले होते.

या जोडप्याची ते राहत असलेल्या त्यांच्या भाड्याच्या घरातच हत्या करण्यात आली होती, त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

“हे जोडपे एकाच अनुसूचित जातीचे आहेत आणि नात्यात आहेत. मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे आणि तिच्या पतीने शाळेनंतर शिक्षण घेतले नाही आणि महिलेच्या कुटुंबासाठी ही एक मोठी समस्या होती,” असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.