राणांचे पाय खोलात ?, “डी” गॅंग कनेक्शनप्रकरणी चौकशीची शक्यता

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात सध्या राणा दाम्पत्य चर्चेत आहेत. हनुमान चालिसा पठणच्या मुद्द्यावरुन झालेल्या संघर्षानंतर अमवरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केला पण मुंबई पोलीस आयुक्तांनी नवनीत राणा या पोलीस स्टेशनमध्ये बसून चहा-पाणी घेत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आणि नवनीत राणा यांच्या आरोपांना उत्तर दिलं. त्यानंतर थोड्याच वेळात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत नवनीत राणा यांच्यावर आरोप केला. नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज युसूफ लकडावाला याच्याकडून घेतल्याचा आरोप राऊतांनी केला. या आरोपामुळे राणा दाम्पत्याचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.

युसूफ लकडावाला याचे दाऊदच्या डी कंपनीशी संबंध असल्याचा आरोप आहे. दाऊदचा हस्तक असलेल्या याच युसूफ लकडावाला याच्याकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतले होते. या संदर्भात नवनीत राणा यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात सुद्धा माहिती दिली होती. त्याचेच कागदपत्रे संजय राऊतांनी ट्विट केले.

राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी दाऊदच्या संबंधित लोकांसोबत व्यवहार केल्याप्रकरणी जर ईडीने अटक केली आहे. युसूफ लकडावाला याच्यासोबत नवनीत राणा यांचे थेट संबंध कसे होते ? इतकी मोठी रक्कम राणा यांनी का घेतली ? या सर्व प्रश्नांची चौकशी होईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

राज्याचे ईओडब्ल्यू विभाग नवनीत राणा यांच्या या व्यवहाराची चौकशी करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईओडब्ल्यूकडे अधिकृतपणे तक्रार करुन दाऊद कनेक्शन शोधण्याची विनंती करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. युसूफ लकडावाला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने अटक केली होती, त्यावेळी त्याचे डी गँग अर्थात अंडरवर्ल्डशी संबंध होते. मग या प्रकरणाची ईडी चौकशी करणार का? हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पुराव्यासह फोटो सुद्धा ट्वीट केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.