मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेक गडावर देणार भेट

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

संपूर्ण देश अयोध्येला जाण्याच्या तयारीत असतांना याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर जिल्ह्यातील रामटेच्या गडावर येणार आहेत. २० ते २३ जानेवारी यापैकी ते कुठल्या दिवशी येणार याची माहीती लवकरच देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण शिवसैनिक कामाला लागले आहे.

मागील लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने लढलेल्या सर्व मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे शिवसैनिकांचे मेळावे घेणार आहे. त्यात रामटेकचाही समावेश आहे. शिवसैनिकांना बूस्टर देण्यासाठी ते प्रत्येक मतदार संघात जाणार आहे. रामटेकचे गडमंदिर हे रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. त्यामुळे ते गडावर जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याचे समजते. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी ६ जानेवारी ही तारीख दिली होती. मात्र त्यात आता बदल करण्यात आला.

२३ तारीख निश्चित झाल्यास ते थेट अयोध्येवरून नागपूरला दाखल होतील असा अंदाज रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केला आहे. शिंदे सेने आल्या सर्व लोकसभा मतदारसंघात सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी मोठा निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रथमच मुख्यमंत्री गड चढणार
राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले. अनेकांनी रामटेकला भेट दिली मात्र गडावर दर्शनासाठी आजवर कोणी गेले नाही. एकनाथ शिंदे रामटेकच्या गडावर जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणारे पहिले मुख्यमंत्री ठरतील, असा दावा शिवसैनिकांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.