श्री राष्ट्रीय राजपुत करणी सेनेने राष्ट्रीय अध्यक्ष सुकदेव सिंह गोगामेडी यांना वाहिली श्रद्धांजली

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

१० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पाचोरा शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक येथे श्री राष्ट्रीय राजपुत करणी सेनेतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष सुकदेव सिंह गोगामेडी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचे जीवनकार्यावर माहिती देऊन ही पोकळी न भरून निघण्यासारखी असल्याचे सांगत घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी असे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी सकल राजपुत समाज बांधव, श्री राष्ट्रीय राजपुत करणी सेना युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष गिरीष परदेशी श्री. राष्ट्रीय राजपूत करणी सेना, खान्देश विभाग अध्यक्ष विलाससिंह राजपूत, क्षत्रिय गृपचे पप्पु राजपुत, श्री. राष्ट्रीय राजपूत करणी सेना तालुका अध्यक्ष महेंद्रसिंग राजपूत, जारगावचे सरपंच सुनील पाटील, वेरुळीचे उपसरपंच अनिल राजपुत, प्रदीप पाटील, अरुण पाटील, बाबजी ठाकरे, विजय पाटील, दादु पाटील विलास राजपुत, संतोष सोमवंशी, राजु परदेशी (गोराडखेडा), राष्ट्रीय राजपूत करणी सेना भडगांव तालुका उपाध्यक्ष सुनिल राजपुत, किरण राजपूत, कुरंगी गट युवा सेना तालुका समन्वय गणेश देशमुख, अध्यक्ष पाचोरा शहर व तालुका समाज बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.