फेसबुकच्या माध्यमातून प्रेम, पण प्रत्येक्षात प्रियसीला बघितलं आणि…..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आजकाल सोशल मीडियावर सर्वच गोष्टी वेगाने होऊ लागल्या आहे. तरुणांना सोशल मीडियावर फोटो पाहून एकमेकांवर प्रेम होते. प्रेम निभावण्यासाठी लोक कोणत्याही ठरला जातात. पण पुढे त्यांना पश्चातापाची वेळ येते. अशीच एक घटना समोर आली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण आणि तरुणीत मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आयुष्याचा निर्णय घेतला. एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचे ठरवले. त्यांनी घरातून पलायन करायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे ठरलेल्याजागी प्रेयसी आली आणि प्रियकरासोबत घरातून पळून गेली. इकडे गावात सगळीकडे मुलीची शोधाशोध सुरु झाली. पण इकडे नियतीने काही वेगळेच लिहले होते. प्रियकराने अर्ध्या वाटेत मुलीचा चेहरा पहिला आणि त्याला धक्काच बसला. आपण सोशल मीडियात पाहिलेला चेहरा आणि प्रत्यक्षात पाहिलेली तरुणी यावर त्याला विश्वास बसत नव्हता. पुढे नेमके काय करायचे? याचा विचार तरुण प्रियकराने केला आणि प्रेयसीला तिच्या घरी पाठवण्याचा निर्णय त्याने घेतला. तरुणाने तरुणीला पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर सादाबाद पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.