संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारत-चीन सीमा वर शस्त्रपूजन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारत-चीन सीमा वर शस्त्रपूजन करण्यात आले. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशात सैन्य दलासोबत दसरा साजरी केली. तवांग येथील भारत-चीन सीमेवर राजनाथ सिंह यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.

चीन सीमेवर संरक्षण मंत्र्यांकडून शस्त्रपूजन
शस्त्रपूजनाचा व्हिडिओ ट्विटर शेअर करत त्यांनी म्हंटल आहे की, विजयादशमीच्या पवित्र दिवशी तवांगमध्ये शस्त्रपूजा. जवानांना संबोधन करताना संरक्षण मंत्र्यांनी जवानांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, मी आजच्याच दिवशी ४ वर्षांपूर्वी येथे आलो होतो. मला वाटले की मी तुमच्यासोबत विजयादशमी साजरी करावी, ज्या ठिकाणी परिस्थितीत तुम्ही देशाच्या सुक्षेच्या जबाबदारी घेता त्याबद्दल मला तुमचा अभिमान वाटतो.

राजनाथ सिंह यांचा सैनिकांशी संवाद
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, बहुतेक सैनिकांना एकदा सैन्यात सेवा करण्याची इच्छा असते. टेरिटोरियल आर्मीच्या माध्यमातून लष्कराचा गणवेश आपल्या अंगावर यावा, अशी राजकारणातील नेत्यांचीही इच्छा असते. देशातील नागरिकांना या गणवेशाचे महत्त्व माहित आहे. देशाच्या नागरिकांना सैनिकांप्रती आदर आहे.

जगासमोर भारताचा दर्जा उंचावला
यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “तुम्ही सीमा सुरक्षित ठेवल्या आणि त्यामुळेच जगासमोर भारताचा दर्जा मोठा होत गेला. गेल्या 8 ते 9 वर्षांत भारताचा दर्जा अधिकच उंचावला आहे, हे वास्तव सर्व विकसित देशांनी स्वीकारले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा दर्जा उंचावला आहे, भारताने आर्थिक विकास केला आहे, हे खरंच महत्त्वाचं आहे, पण तुम्ही देशाची सीमा सुरक्षित ठेवली नसती तर, हे शक्यच झालं नसतं.”

Leave A Reply

Your email address will not be published.