अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबांचा इस्रायल इशारा, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इस्राइल आणि हमास त्यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा आज १८ वा दिवस आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर इस्राइलने आक्रमक पवित्रा घेत गाझा पट्टीत प्रतिहल्ला चढवला आहे. मात्र एवढ्या दिवसांनंतरही हे युद्ध सुरूच आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांनी इस्त्रायलने हमासवर केलेल्या हल्ल्यावरून इशारा दिला. गाजवरील हल्ल्याचे परिणाम इस्त्रायलला भोगावे लागतील. असं बाराक ओबामा यांनी म्हटले आहे. बाराक ओबामा इस्त्रायलला संयम बाळगायचे आवाहन केले आहे.

अमिरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इस्त्रायलने हमासवर केलेल्या हल्ल्यावरून इशारा दिला आहे. गाजवरील हल्ल्याचे परिणाम इस्त्रायलला भोगावे लागणार आहे. इस्त्रायलने गज्जा पट्टीवर हल्ला सुरूच ठेवले तर, त्यांना जागतिक स्तरावर मिळत असलेला पाठींबा कमी होईल, ज्याचा वापर शत्रू देशांना त्यांच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो. असं ओबामा यांनी म्हंटल आहे. गाझामधील नागरिकांसाठी अन्न, पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याच्या इस्रायल सरकारच्या निर्णयामुळे पॅलेस्टिनी नागरिक आणखी कठोर होऊ शकतात. गाझावरील हल्ल्यामुळे प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी इस्रायलच्या दीर्घकालीन प्रयत्नांना खीळ बसेल, असंह बराक ओबामा यांनी म्हटलं.

गाझामधील परिस्थिती भीषण
इस्त्रायल-हमास युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत सुमारे ५००० लोकांचा मृत्यू झाला आहे. गज्जा पट्टीमध्ये सर्वात मोठा विनाश पाहायला मिळत आहे. इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे गाझा पट्टीत ३ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यावरून इस्त्रायलवर टीका होत आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की जोपर्यंत हमासचे सर्व तळ नष्ट होत नाहीत तोपर्यंत हा हल्ला सुरूच राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.