क्रूरतेचा कळस ! कुत्र्याला गाडीला बांधून नेले फरफटत (व्हिडीओ)

0

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क 

क्रूरतेचा कळस गाठणारी एक घटना राजस्थानमधून उघडकीस आली आहे. राजस्थानच्या जोधपूरमधील सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये जोधपूरमध्ये एका डॉक्‍टरने कुत्र्याला कारला बांधून पाच किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा कुत्रा डॉक्‍टरच्‍या घरात घुसला होता, यामुळे रागात डॉक्‍टरने असे केले असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. रजनीश गालवा हे एसएन मेडिकल कॉलेजमध्ये असून ते प्लास्टिक सर्जन आहेत.

दरम्यान या कुत्र्याचा जीव दुचाकीस्वारांनी वाचवला असुन डॉक्टरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर रजनीश गालवा असे आरोपीचे नाव आहे. डॉक्टर रजनीश गालवा यांनी त्यांच्या डॉक्टर सहकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले आणि तरुणांना जबर मारहाण केली. तरुणांनी मनेका गांधी यांना दिल्लीत या प्रकरणाची माहिती दिली होती. मनेका गांधी यांनी शास्त्रीनगर पोलीस स्टेशनच्या स्टेशन ऑफिसरला फोन केला आणि डॉक्टर विरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, कुत्र्यावर उपचार सुरु आहेत.

तसेच या घटनेची माहिती मिळताच डॉग होम कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून कुत्र्याला उपचारासाठी पाठवले. त्यांनी डॉक्टरांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांना वाहनाने धडक देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही लोकांनी केला. दरम्यान, अनेकदा कुत्रा घरात घुसून घराबाहेर भुंकत राहतो आणि त्यामुळे असे करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.