“बेरोजगारी आणि महागाई मोठ कारण”; राहुल गांधी पहिल्यांदाच संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलले…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत प्रथमच विधान केले आहे. यामागे बेरोजगारी आणि महागाई हे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, सुरक्षेत त्रुटी का आहे ? पण असे का झाले ? सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे बेरोजगारीचा मुद्दा, ज्यावरून संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करत म्हटले की, त्यांच्या धोरणांमुळे भारतातील तरुणांना रोजगार मिळत नाही. बुधवारी संसदेत सुरक्षेमध्ये गडबड झाली होती, या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संसदेच्या सुरक्षेवर राहुल गांधींनी पहिल्यांदाच विधान केलं

13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर पहिला दहशतवादी हल्ला झाला होता. 13 डिसेंबरला या हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या दिवशी संसदेच्या सुरक्षेचा भंग झाला होता. या वेळी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सभागृहाचे कामकाज सुरू असताना दोघांनी सभागृहात उड्या मारल्या. यानंतर त्यांनी संसदेत पिवळा धूर पसरवला. घटनेनंतर लगेचच दोन्ही आरोपींना पकडण्यात आले. दरम्यान, अन्य दोन लोकांनी सभागृहाबाहेर लाल आणि पिवळा धूर उडवून संसद भवनाबाहेर निदर्शने केली. सागर शर्मा आणि मनोरंजन डी अशी लोकसभेत उडी घेतलेल्या दोन तरुणांची नावे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.