महाराष्ट्रातील 9 रोड ओव्हर ब्रिजचे उद्घाटन आणि नागपूर शहरातील 5 फ्लायओव्हर्सचा भूमिपूजन समारंभ

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

महारेलतर्फे (Maha Rail) महाराष्ट्रातील नऊ उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नागपूर शहरातील पाच फ्लायओव्हर्सचे भूमिपूजन समारंभ रविवार १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता नागपूरच्या नंदनवन भागातील के.डी.के.कॉलेज जवळ संपन्न होणार आहे. हा समारंभ केंद्रीय मंत्री रस्ते, वाहतूक आणि महामार्ग नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचे पालकमंत्री, राज्यसभा व लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य आणि विधानसभेचे सदस्य यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर महानगरपालिका इ. प्रशासकीय कार्यालयातील सन्मानीय अधिकारी आणि महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.