आसोदा येथील तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव : तालुक्यातीलआसोदा गावात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पायल संदीप चौधरी रा. आसोदा ता. जि. जळगाव असे मयत तरुणीचे नाव

आहे. पायल संदीप चौधरी ही तरुणी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरुवार १४ डिसेंबर रोजी दुपारी घरी कोणीही नसताना तिने राहत्या घरात गळफास घेऊन

आत्महत्या केली. हा प्रकार दुपारी ४ वाजता उघडकीला आला. दरम्यान तरूणीने गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याची पाहायला मिळाले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे हे करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.