राहुल गांधी बनले कुली नंबर वन ! हमालांच्या जाणून घेतल्या समस्या

0

 

नवी दिल्ली ;- दिल्लीतल्या आनंद विहार रेल्वेस्थानकावर जाऊन तिथल्या हमालांशी बातचीत केली. यावेळी राहुल गांधी यांनी हमालांचा लाल रंगाचा शर्ट परिधान करून एका प्रवाशाची बॅग डोक्यावर घेतली. काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान ते देशभरातल्या असंख्य लोकांना भेटले. अलिकडेच त्यांनी अवजड वाहनचालकांबरोबर, भाजी विक्रेत्यांबरोबर एक दिवस घालवला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, राहुल गांधी यांनी गुरुवारी (२१ सप्टेंबर) दिल्ल्लीत आनंद विघार रेल्वे स्थानकावर भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून सोडविण्याचे आश्वासन दिले.

राहुल गांधी यांनी हमालांचा लाल शर्ट परिधान केला, हमालांचा अधिकृत नंबर असलेला बिल्ला (बॅच) दंडावर बांधला. तसेच एका प्रवाशाची बॅग डोक्यावर घेऊन काही अंतर चालले. तसेच या हमालांबरोबर त्यांनी बराच वेळ गप्पा मारल्या. देशातल्या सध्याच्या स्थितीवर या हमालांचं मत जाणून घेतलं.

Leave A Reply

Your email address will not be published.