राहुल राठोड यांचा महाराष्ट्रीयन सेवा मंडळात प्रवेश

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

अंकलेश्वर-गुजरात राज्यातील महाराष्ट्रीयन लोकांच्या हित आणि हक्कासाठी लढणारी तसेच महाराष्ट्रीयन लोकांच्या मदतीला नेहमी धाऊन येणारे एकमेव मंडळ म्हणजे “महाराष्ट्रीयन सेवा मंडळ” मंडळाचे प्रमुख नाथु दोरिक, सेक्रेटरी दिलीप पटेल यांच्या सोबत बैठक संपन्न झाली. या बैठकीत राहुल राठोड यांनी मंडळात येण्याचे मत वक्त केले. राहुल राठोड हे बंजारा ब्रिगेडचे गुजरात राज्य संघटक आहेत. त्याच बरोबर त्यांनी अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या धुळे जिल्हा अध्यक्ष आणि राष्ट्रीय बंजारा परिषदच्या गुजरात राज्य संघटक पदावर राहून सामाजिक कार्य केले आहेत.

मंडळाचे आभार मानतो -राहुल राठोड
“महाराष्ट्रीयन सेवा मंडळाला आश्वासन देतो की, मी आणि माझे लोक जरी बंजारा समाजाचे असतील तरी गुजरात राज्यत कोणी पर प्रांतीय लोक जेव्हा विचारात तु गुजराती आहेस की मराठी तेव्हा आम्ही मराठी आहोत हेच बोलतो आणि महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान अमच्यातही आहे, मी आणि माझे बंजारा समाज बांधव महाराष्ट्रीयन सेवा मंडळाच्या सोबत राहुन कार्य करतील, मंडळाचे आभार आपण मला आपल्या मंडळात सामील करून घेतलेत”.

Leave A Reply

Your email address will not be published.