सलमानच्या फार्महाऊसच्या तारा तोडून आत घुसण्याचा प्रयत्न, २ जण ताब्यात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेता सलमान खानच पनवेलचे फार्महाउस सर्वांचा माहित आहे. मात्र त्याच्या फार्महाऊसमध्ये बेकायदेशीर घुसण्याचा प्रयत्न काही तरूणांकडून झाला आहे. तारा तोडून सलमानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याच्या प्रयत्नांत असलेल्या दोन तरुणांना सुरक्षारक्षकांनी पकडले आणि पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांकडे बनावट आधार कार्ड सापडले असून, गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

पोलिसांना दिली खोटी माहिती

अजेशकुमार ओमप्रकाश गिल (वय २३) आणि गुरुसेवकसिंग तेजासिंग सीख (वय २३, रा. पंजाब) अशी यांची नवे असून, त्यांची चौकशी सुरु आहे. दोघांनी ४ जानेवारीला संध्याकाळी ४ वाजता वाजेगाव येथील अभिनेता सलमान खान याच्या अर्पिता फार्महाऊसमध्ये तारा आणि झाडांच्या कम्पाउंडधून धुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फार्महाऊसच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडले होते. तेव्हा त्या दोन तरूणांनी खोटी नावं सांगितली. महेशकुमार रामनिवास व विनोदकुमार राधेशाम अशी आमची नावं असून उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र त्या सुरक्षारक्षकींना दोघा तरूणांचा संशय आल्याने, त्यांनी पोलिसांना बोलावलं.

त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवत तरुणांची चौकशी केली असता, त्यांनी आपली खरी नाव सांगितले. त्यानंतर त्यांच्या फोनची तपासणी केली असता दोघांनी आपले छायाचित्रे वापरून बनावट नावाचे आधार कार्ड बनवल्याचे आढळले. अखेर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. सलमान खान याला भेटण्यासाठी दोन्ही तरूणांनी घुसखोरीचा हा खटाटोप केल्याचे चौकशीत सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.