चाहत्यांची प्रतीक्षा संपली, पुष्पा २चा पहिला टीझर झाला रिलीज

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

‘पुष्पा’ (Pushpa) या सिनेमाने सर्वच रसिकांच्या मनावर राज्य केल, आणि आता चाहते उत्सुक आहेत तर दुसऱ्याला भागाला घेऊन. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर फिल्म ‘पुष्पा २चा’ (Pushpa 2) पहिला टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये दिग्दर्शक सुकुमार (Sukumar) यांनी पुष्पराजची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. रिलीज झालेल्या टीझरमध्ये ‘पुष्पा’ तिरुपती तुरुंगातून फरार असल्याचे दाखवण्यात आले आहे. पोलिस कोणाच्या शोधात गुंतले असून शहरात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पण याच दरम्यान दिग्दर्शक सुकुमारने आणखी एक मोठा इशारा दिला आहे.

टीझरमध्ये निर्मात्यांनी स्पष्ट केले की, हा प्रवास अजून संपणार नाही. पुष्पा राजचा शोध सुरू झाला आहे पण त्याची आणखी एक झलक लवकरच पाहायला मिळणार आहे. रिलीज झालेल्या टीझरमध्ये, निर्मात्यांनी स्पष्ट केले की ‘पुष्पा २चा’ पुढील टीझर अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) वाढदिवसाच्या संध्याकाळी रिलीज होणार आहे.

अभिनेत्री रश्मीका मंदाना (Rashmika Mandana) हीच आज वाढदिवस पुष्पाची श्रीवल्ली उर्फ ​​अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आज तिचा २७वा वाढदिवस साजरा करत आहे. हा प्रसंग आणखी खास बनवण्यासाठी तिच्या आगामी ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी श्रीवल्लीच्या चाहत्यांना ही खास भेट दिली आहे. पुष्पा २चा दमदार टीझर रिलीज करण्यापूर्वी, दिग्दर्शक सुकुमार आणि त्यांच्या पुष्पा चित्रपटाच्या टीमने अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसानिमित्त खूप गोंडस पोस्टरसह शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.