‘हनुमान जन्मोत्सवाला’ गालबोट लागू नये यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय अलर्टवर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

रामनवमी (Ram Navami) नुकतीच पार पडली आणि आता उद्या हनुमान जन्मोत्सव (Hanuman Janmotsav )साजरा करण्यात येणार आहे. या सणाला गालबोट लागू नये, यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, राम नवमीच्या दिवशी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि जळगावमध्ये (Jalgaon) हिंसाचार झाला होता. तसेच पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार या राज्यांमध्येही हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळं उत्सवाला गालबोट लागलं होतं. यावरुन बरेच राजकीय आरोप-प्रत्यारोपही पहायला मिळाले होते.देशभरात साजरी होणार आहे. पण राम नवमीच्या दिवशी देशातील विविध भागांत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालय अलर्टवर आहे. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राज्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं नवी अॅडव्हाजरी जाहीर केली आहे. यामध्ये सर्व राज्यांना हनुमान जयंतीनिमित्त कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सणाचे दिवस शांततेत पार पडावे यासाठी सर्व काळजी घेण्यात येत आहे. तसेच समाजात कोणी जातीय सलोख्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतंय का? याकडं राज्यांच्या पोलिसांनी लक्ष द्यावं, असंही या अॅडव्हाजरीमध्ये गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान, राम नवमीच्या दिवशी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये हिंसाचार झाला होता. तसेच पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार या राज्यांमध्येही हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळं उत्सवाला गालबोट लागलं होतं. यावरूनच हि खबरदारी घेण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.