‘प्रवीण तरडे’ घेऊन येत आहे ‘बलोच’

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

सध्या ‘प्रवीण तरडे’ (Pravin Tarde) जोमात आहे असं म्हणायला हरकत नाही, सरसेनापती हंबीरराव मोहिते, वेडात मराठे वीर दौडले सात, हा चित्रपटानंतर पुन्हा नवीन सिनेमा प्रवीण तरडे घेऊन येत आहे. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा डोळ्यांसमोर उभी करणारा धगधगता चित्रपट म्हणजे ‘बलोच’ (Baloch). पानिपतच्या पराभवांनंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांनी अनुभवलेल्या भयाण वास्तव्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटात प्रवीण तरडे यांची प्रमुख भूमिका आहे, तर कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार (Prakash Janardan Pawar) यांचे आहे. ‘बलोच’ हा चित्रपट येत्या 5 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

पानिपतचा पराभव मराठ्यांसाठी महाप्रलयच ठरला. या पराभवानंतर बलुचिस्तानात मराठ्यांना गुलामगिरी पत्करावी लागली. ‘बलोच’च्या या मोशन पोस्टरमध्ये प्रवीण तरडेंच्या नजरेत मराठ्यांना मिळणाऱ्या वागणुकीविरोधात धगधगणारी आग आणि सूड भावना दिसत आहे. पानिपतची लढाई आणि पराभव ही मराठेशाहीसाठी जरी काळा दिवस असला तरी मराठी ही मराठ्यांच्या असीम शौर्याची गाथा आहे, जी ‘बलोच’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.