शिवसेना आणि शीख संघटनेत राडा; तुफान दगडफेक, गोळीबारानंतर तलवारीनं हल्ला (व्हिडीओ)

0

पंजाब, लोकशाही न्यूज नेटवर्क

पंजाबमध्ये शीख तरुण आणि शिवसेना एकमेकांसोबत भिडले आहे. पटियाला येथे काही शीख तरुणांनी दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खलिस्तान मुर्दाबाद मार्चच्या विरोधात मोर्चा काढला. ज्यात त्यांनी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि शिवसैनिकांना बंदर सेना असं नाव दिलं. शिवसैनिकांच्या या मोर्चाला तीव्र विरोध करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी काली माता मंदिरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. हिंदू आणि शीख संघटनांमध्ये दगडफेकीच्या घटनाही घडल्या.

घटनास्थळी नियंत्रण मिळवण्यासाठी एसएसपी पोहोचले आणि त्यांनी हवेत गोळीबार केला. यादरम्यान हिंदू नेता आणि त्रिपदीचे एसएचओ कर्मवीर सिंग जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तान समर्थकांनी एसएचओ वर तलवारीनं हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सुमारे 15 राऊंड गोळीबार केला.

पोलिसांकडून अजूनही गोळीबार सुरू आहे. काली माता मंदिराबाहेर खलिस्तान समर्थक मोठ्या संख्येनं जमले आहेत. दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पंजाब कार्याध्यक्ष हरीश सिंगला यांच्या नेतृत्वाखाली आर्य समाज चौकातून खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिक खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत फिरत होते.

हरीश सिंगला म्हणाले की, शिवसेना पंजाबमध्ये कधीही खलिस्तान होऊ देणार नाही आणि खलिस्तानचे नाव घेऊ देणार नाही. सिंगला म्हणाले की, शीख फॉर जस्टिसचे निमंत्रक गुरपतवंत पन्नू यांनी 29 एप्रिल रोजी खलिस्तानचा स्थापना दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेने 29 एप्रिल रोजी खलिस्तान मुर्दाबाद मार्च काढण्याची घोषणा केली होती. मोर्चाची माहिती मिळताच खलिस्तान समर्थक मोठ्या संख्येने पोहोचले.

काही मीडिया चॅनेल्सवर सुरू असलेल्या पोलीस स्टेशनच्या एसएचओचा हात कापल्याच्या वृत्ताचे डीसींनी खंडन केलं आहे. अशी कोणतीही घटना घडली नाही किंवा ही केवळ अफवा असल्याचे डीसींनी म्हटलं आहे. श्री कालीदेवी मंदिर भक्तांसाठी बंद पटियाला येथील श्री काली देवी मंदिराबाहेर झालेल्या दगडफेकीनंतर सध्या श्री काली देवी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलं आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

येथे आयजी पटियाला रेंज राकेश कुमार अग्रवाल यांच्यासह डीसी साक्षी साहनी आणि एसएसपी नानक सिंह यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. सध्या डीसी साक्षी साहनी यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही संघटनांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. आयजीसह, डीसींनी पटियालाच्या रहिवाशांना शांतता राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून यावेळी एक पोलीस कर्मचारी आणि शीख संघटनेचा एक सदस्य जखमी झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.