प्रौढाला ट्रॅक्टरची जोरदार धडक; जागीच मृत्यू

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भरधाव ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा चौफुलीवर घडली. याप्रकरणी ट्रॅक्टरचालकावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील पहूर येथील राहणारे विलास बाबुलाल चौधरी (वय ४५) हे कामाच्या निमित्ताने भडगाव शहरातील पाचोरा चौकात २१ एप्रिल रोजी रात्री १० वाजता आले होते. रात्री रस्त्यावर वाहनाची वाट पाहत असतांना त्यावेळी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच २० सीटी ८०९८) ने जोरदार धडक दिली.

या धडकेत विलास चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर घेवून पसार झाला होता. याप्रकरणी मयताची पत्नी विजया विलास चौधरी यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाहेकॉ विजय जाधव करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.