डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस, वाचा सविस्तर

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये (D. Y. Patil College) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कॉलेजमध्ये ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात आल्यामुळे महाविद्यालयातील प्राचार्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सूत्रांनुसार, पुणे जिल्ह्यातील तळेगाव आंबी येथे डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थचे महाविद्यालय आणि विद्यालय आहे. या महाविद्यालयातील लेडीज टॉयलेट मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे का लावले? आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना का घेतल्या जातात? हे दोन्ही आरोप करून प्राचार्य अलेक्झांडर यांना मारहाण करण्यात आली. यात त्यांचे कपडे फाटल्याचं दिसत आहे. हा प्रकार थांबवला जावा आणि प्राचार्यांची बदली लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

“इथे मुलांना संस्कार मिळतील या हेतूने आम्ही मुलांना शाळेत घालतो पण या ठिकाणी जर फक्त ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना घेतल्या जात असतील तर हे चुकीचे आहे. जोपर्यंत पप्राचार्यांची बदली होत नाही तो पर्यंत शांत बसणार नाही”. असा इशारा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.