प्रियांका गांधी राजकारणात असा करणार प्रवेश

0

नवी दिल्ली ;- काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस आणि नेत्या प्रियांका गांधी यांची राजकीय इनिंग लवकरच राज्यसभेतून सुरू होऊ शकते.

सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयात त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी पूर्ण करण्यात आल्याचे वृत्त आहे.

दुसरीकडे, 2024 मध्ये सोनिया गांधी गांधी घराण्याच्या पारंपारिक रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींसोबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत प्रियांका गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार नसून, हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एका जागेवर निवडणूक लढविण्याऐवजी प्रियांका गांधी यांनी पक्ष आणि यूपीए आघाडीचा प्रचार संपूर्ण देशात करावा, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, प्रियंका यांनी प्रचारासाठी केवळ यूपीपुरते मर्यादित न राहता त्यांनी देशाच्या इतर भागातही जावे.

प्रियांका गांधी या मोठ्या स्टार प्रचारक ठरू शकतात, त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये, असे पक्षातील बहुतांश नेत्यांचे मत आहे.

मात्र, लोकसभा निवडणूक लढवून प्रियांका मोठा चेहरा म्हणून समोर येतील, असे मत काही नेत्यांचे होते. बहुतेक नेत्यांचे असेही मत आहे की काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान चेहरा म्हणून कोणालाही प्रोजेक्ट करू नये, जेणेकरून मित्रपक्ष अधिक आत्मविश्वासाने यूपीए आघाडीत सामील होतील.
गांधी परिवारातील कोणता सदस्य अमेठीतून निवडणूक लढवणार?

काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू-गांधी परिवारातील कोणताही सदस्य यावेळी अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

अमेठीच्या जागेवर कुटुंब आणि काँग्रेस पक्षाला आता फारसा रस नाही. महाआघाडी झाल्यास काँग्रेस अमेठीच्या जागेवर प्रभावी दावाही करू शकणार नाही.

महाआघाडी झाल्यास काँग्रेस ही जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळी सोनिया गांधी निवडणूक लढवण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून, यावेळी सोनिया निवडणूक लढवणार नसल्या तरी रायबरेलीतून काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढवणार आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि या वर्षअखेरीस होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी प्रियंका गांधींना मोठ्या भूमिकेत आणण्याची तयारी काँग्रेस करत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ‘

अशा परिस्थितीत प्रियंका गांधी यांना राज्यसभेवर पाठवले तर ही त्यांच्यासाठी नवी राजकीय खेळी असेल. हिमाचल प्रदेश निवडणुकीत सक्रिय झाल्यानंतर प्रियांका गांधी कर्नाटकात खूप सक्रिय होत्या. हिमाचल प्रदेशपाठोपाठ आता कर्नाटकातही प्रियंकाच्या निवडणुकीतील सहभागाचा परिणाम दिसून आला.

Leave A Reply

Your email address will not be published.