जळगावात मुलभूत सोयीसुविधांचा विकास” योजनेंतर्गत नऊ कोटी रुपये निधी मंजूर

0

जळगाव;- शहरात “महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास” योजनेंतर्गत नऊ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ही जळगाव शहरातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बाब असून यामध्ये शहरातील विविध विकास कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. खासदारउन्मेष पाटील व जळगाव शहराचे आ. सुरेश दामु भोळे (राजुमामा) यांच्या विशेष प्रयत्नांनी सदरचा निधी प्राप्त झाला असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , ना.गिरीश महाजन, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.जळगाव शहर वासीयांच्या वतीने आमदार राजुमामा भोळे यांनी आभार मानले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.