द्रौपदी मुर्मूंनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ !

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

द्रौपदी मुर्मू  (Draupadi Murmu) यांनी आज 25 जुलै रोजी देशाच्या 15व्या राष्ट्रपती (15th President of India) म्हणून शपथ घेतली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये   (Parliament House)  हा समारंभ पार पडला. द्रौपदी मुर्मू यांना सरन्यायाधीश एन. व्ही. रामन (CJI NV Ramanna) यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत.

रामनाथ कोविंद यांनी द्रौपदी मुर्मू यांचे राष्ट्रपति भवनात (Rashtrapati Bhavan) पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नवनिर्वाचित राष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले होते. शपथविधी सोहळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), सरन्यायाधीश रमणा, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रिपरिषदचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारचे प्रमुख, नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषण केले. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या, ‘मी स्वतंत्र भारतात जन्मलेली देशाची पहिली राष्ट्रपती देखील आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. जमतेचे कल्याण हेच माझे ध्येय आहे. पुढे त्या म्हणाल्या पुढील काळात जलद गतीने काम करणार. मी स्वातंत्र्य भारतात जन्मलेली पहिली महिला राष्ट्रपती, जनतेचं कल्याण हेच माझं ध्येय आहे असे त्या म्हणाल्या.

 द्रौपदी मुर्मू यांचा परिचय

द्रौपदी मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या आहेत. ओडिशातील BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 या काळात त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेली नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावा, अशी मागणी केली जात होती. आता द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.