डबल डेकर बसचा भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

0

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh)  बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात मद्राहा गावाजवळ पूर्वांचल द्रुतगती मार्गावर डबल डेकर बसचा भीषण अपघात  (Double Decker Bus Accident) झाला आहे. या अपघातामध्ये  8 जणांचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशातील पूर्वांचल द्रुतगती मार्गावर (Purvanchal Expressway) हा भीषण अपघात झाला. भरधाव असलेल्या डबल डेकर बसने दुसऱ्या डबल डेकर बसला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 8 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 35 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

ही बस बिहारमधील (Bihar) सीतामणी येथून दिल्लीला (Delhi) जात होती. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्वांचल द्रुतगती मार्गावर हा भीषण अपघात झाला. आज सकाळी लोणीकटरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रपूर मदरहा गावाजवळ भरधाव डबलडेकर बसने उभ्या असलेल्या डबल डेकर बसला धडक दिली. या अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 35 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य केले. या अपघातामध्ये दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातामध्ये जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना सीएचसी हैदरगडमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांनी ट्वीट करत पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर झालेल्या बस अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.