वादग्रस्त प्रवीण चव्हाण यांना राज्य सरकारचा फटका

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांच्यावर भाजप (BJP) नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप होता. दरम्यान प्रवीण चव्हाण यांना राज्य सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्याविरोधातील खटल्यातून हटवले आहे. त्यांच्या जागी या खटल्यात अजय मिसर (Ajay Misar) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रवीण पंडित चव्हाण हे विशेष सरकारी वकील आहेत. सुरेशदादा जैन, रमेश कदम, डीएसके, महेश मोतेवार, बीएचआर बँक, रवींद्र बराटे यांच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे.

प्रवीण चव्हाण यांची राज्यातील अनेक महत्त्वाच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून आघाडी सरकार काळात नेमणूक झाली होती. जळगावमधील एक फसवणुकीचा दाखल गुन्हा पुण्यात वर्ग करून त्यामध्ये गिरीष महाजन यांना मोक्का लावण्याचा कट केल्याचा चव्हाण यांच्यावर आरोप करण्यात आला होता. चव्हाण यांच्याकडे डीएसके, रवी बर्हाटे, शिक्षक भरती घोटाळा असे अनेक प्रकरणे आहेत.

दरम्यान देवेंद्र फडवणीस यांनी आरोप करत म्हटले होते की, महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांवर सूड उगवण्याचे षडयंत्र रचत आहेत. साक्षिदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे मॅनेज केले जात आहे. तसेच त्यांनी हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना आहे आणि सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत आहेत, असा आरोप करत 125 तासांच्या स्टिंग ऑपरेशनचे फुटेज विधानसभेत जमा केले होते. सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून फडणवीस यानी सादर केला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.