नात्याला काळिमा; सख्ख्या भावानेच केले बहिणीचे लैंगिक शोषण…

0

 

वर्धा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

बहिण भावाच्या नात्याचे पावित्र्य आणि थोरवी हि नव्याने सांगण्याची गरज नाही. बापानंतर भाऊ हा आपल्या बहिणीसाठी सर्वस्व असतो. पण, वर्ध्यात भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या सख्ख्या लहान बहिणीचे लैंगिक शोषण (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहर पोलीसांनी आरोपी नराधम भावाला ताब्यात घेतले आहे.

वर्धा येथे विकृत मनोवृत्तीच्या सख्ख्या भावाने नात्याला काळिमा फासत स्वतःच्या लहान बहिणीवर अत्याचार ( Sexual Assault ) करून तिला गर्भवती केल्याचे समोर आले आहे. 15 वर्षीय पिडीत मुलगी घरात होती. आई वडील कामानिमित्ताने बाहेर गेले असताना 17 वर्षीय भावाने बहिणीवर अत्याचार केला. पिडीत मुलीच्या पोटात दुखत असल्यानें तपासणी केली असतांना ती गर्भवती असल्याचे समोर आले. तेच सखी वन स्टॉप सेंटरच्या महिला अधिकाऱ्यांनी तिचे समुपदेशन करत तिच्याकडून घडला प्रकार समजला. त्यात 11 वी मध्ये शिकणाऱ्या सख्ख्या भावानेच हे दुष्कर्म केल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.