‘मनुष्याने कर्तव्यापासून कधीच दूर जाऊ नये..’

0

 

प्रवचन सारांश 17.10.2022

 

मानवाने भापल्या कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यापासून कधीच दूर जाऊ नये, मानव व पशु जीवन  यात फरक हा आहे की पशुंना कर्तव्य नसतात व  मानला कर्तव्य असतात. या बाबतचे आजच्या प्रवचनात पू. जयपुरंदर म.सा. यांनी सांगितले.

माझ्या कर्तव्यापासून मी कधीच दूर होणार नाही. पशू आणि मानव यांचे याबाबत उदाहरण आपला प्रवचनात सांगितले, ‘मेरी भावना’ या रचनेत कर्तव्याबद्दल जागृतता निर्माण करतात. सत्यवादी, कर्तव्यनिष्ठ राजा हरिश्चंद्र राजा यांच्या कथेचा पुढील भाग डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर म.सा. यांनी सांगितला.

विश्वमित्र ऋषि यांच्या मनात राजा हरिश्चंद्र यांच्या बद्दल क्रोध आला. राजाच्या दरबारात ऋषि पोहोचले. राजा हरिश्चंद्र यांच्याशी क्रोधाने ऋषि म्हणाले, ‘तुम्ही आश्रमात येऊन चुकीचे काम केले. आमच्या ऋषिंसाठी तुम्ही काय केले?’ असे विचारले. तू स्वतःला न्यायप्रिय, म्हणवतोस हे राज्य मला दे.’ असे ऋषि विश्वामित्र राजाला म्हणाले. हरिश्चंद्र राजा म्हणाले की, आण्ही सूर्यवंशी आहोत, वचनाचे पक्के आहोत. त्यांनी एका क्षणात राज्य देऊन टाकले. मी वचन दिले राज्याचा स्वीकार करून उपकृत करावा. मला एक हजार सुवर्ण मोहरा दक्षिणेत हव्या आहेत. राजाने व्यवस्था केली.पण ऋषि म्हणतात आता राज्य व राज्याचा खजाना माझा झाला. त्यातून ते दान तुम्हाला देता येणार नाही.एका महिन्याच्या अवधीत तुम्ही स्वतः एक हजार सुवर्ण मोहरा कमवा व मला द्या. तेही राजाने मान्य केले.राजा वचन पाळायला पक्के होते. आपल्या सत्यावर अजून होते. सत्यवादी हरिश्चंद्र कोमल हृदयी असतात पण ज्यावेळी सत्य व न्याय हा विषय येतो त्यावेळी वज्र हृदयी बनलेले असतात. घडलेली गोष्ट पत्नी तारामती, मुलगा रोहित यांना सांगतात. पत्नी राणी तारामती राजाला साथ देते. ती सुख-दुःखात सोबतच राहते. ऋषि विश्वामित्रांची राजाने माफी मागितली तर हा विषय संपेल असे सांगण्यात आले परंतु आपले वचन पाळण्यासाठी राजा तसे न करता ऋषि आदेशानुसार आपले राज्य सोडतात व एक हजार सुवर्ण मोहरा कमावण्यासाठी ते तिघेही राज्या बाहेर जातात. त्यांच्या जीवनात पुढे काय होते याबाबत रंजक कथानक पुढील प्रवचनात अवश्य ऐकायला मिळेल. भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा.

स्वाध्यायभवन येथे जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री पार्श्वचंद्र म.सा. आदिठाणा सात यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास सुरू आहे. त्यात जय धरंधर मुनी यांचेही ‘आगम शास्त्र’ विषयावर प्रवचन सुरू आहे. मनुष्यभव अत्यंत दुर्लभ असल्याचे सांगत प्रबळ पुण्यवाणी मुळे मनुष्य जन्म प्राप्त होतो. हे मनुष्य जीवन असेच व्यर्थ घालवू नये असे आवाहन आजच्या प्रवचनात करण्यात आले. प्राणी व माणूस हे एकाच वेळी दोन्हीही बुडत असेल तर आधी प्राणी ला की मानवाला वाचविले जाते? त्यावर उत्तर मिळते की, प्राण्यापेक्षा मानवाला वाचविण्यास अधिक प्राधान्य दिले जाते. म्हणजेच मानव जन्म अत्यंत दुर्लभ आहे हे सिद्ध होते. तसे पाहिले तर देव लोकात जन्म घेणे उत्तम मानले जाते परंतु देवांचीही मनुष्य लोकात जन्म घेण्याची इच्छा असतेच. याबाबत एका गावात मुनी पोहोचतात व ते काही प्रवचन देत नाहीत. त्यावर महाराज काही सांगा असे लोक म्हणतात त्यावर मुनी एकच उत्तर देतात की, आधी मानव बना. लोकांना त्यांचा या बोलण्याचा राग येतो. आम्ही मानव आहोत गायीचे धांडे नव्हे. त्यावर मुनी एक चश्मा देतात व त्यातून सत्य काय ते बघा असे सांगतात. स्वयंपाक करणारी शेठाणी कुत्री दिसते. कुत्री ज्याप्रमाणे आपल्या संसारात, पिल्लांना मोठे करण्यात मग्न असते त्या प्रमाणे शेठला ती शेठाणी दिसते. आपल्याकडे पाहून शेठजी काय हसतात ह्या उत्सुकतेने ती चश्मा घेते व शेठजींकडे पाहते. शेठजींच्या जागी गाढव तिला दिसते. संसारात मानव सुख संसार रुपी ओझे वाहतो म्हणून गाढव दिसते. धर्म, आराधना करत नाही. व्यर्थ वेळ घालवित आहे. कर्माचे भार वाहू नका, मोक्षासाठी प्रयत्न करा असे मोलाचे आवाहन आजच्या प्रवचनात करण्यात आले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.