“अविष्कार 2022” 18 ऑक्टोबरला मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजित जिल्हास्तरीय “अविष्कार” स्पर्धा 2022 चे आयोजन दि. 18 रोजी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे. त्याची पूर्व तयारी अंतिम टप्प्यात असून या स्पर्धेत एकूण 744 पोस्टर व मॉडेलची नोंदणी झाली आहे. चार टप्प्यात घेण्यात येणारी ही स्पर्धा संशोधनाची आवड निर्माण व्हावी याकरिता राज्यपाल (कुलपती) यांच्या वतीने विद्यापीठस्तरीय, राज्य व राष्ट्रीय पातळीवर होत असते.

कृषी व पशुसंवर्धन(74), वाणिज्य व्यवस्थापन व विधी(49), अभियांत्रिकी व तंत्रज्ञान(85), सामाजिक शास्त्र, भाषा, मानव्यविद्या, ललित कला (176), औषध निर्माण शास्त्र(87), विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र, गणित, पर्यावरण शास्त्र, गृह आणि संगणक शास्त्र) (263) अशा एकूण 744 प्रवेशिका यंदाच्या स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या आहेत. येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता त्यांच्या सादरीकरणाकारीता लागणाऱ्या मुलभूत गरजा लक्ष्यात घेऊन सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रचार्य संजय भारंबे यांनी दिली.

या जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.व्ही.एस.माहेश्वरी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केसीई संस्थेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता मूळजी जेठा महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल प्रांगणात होणार असून विविध मॉडेल्सची मांडणी पदार्थ विज्ञान प्रशाळेत करण्यात येणार आहे. या संशोधन स्पर्धेत सहभागी विद्यार्थी शिक्षक यांच्या संशोधनाची अधिक माहिती घेण्याकरिता विद्यार्थी व पालकांनी या जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा मूळजी जेठा महाविद्यालय परिसराला भेट द्यावी असे आवाहन प्राचार्य संजय भारंबे यांनी केले. या पत्रकार परिषदेला प्राचार्य संजय भारंबे, जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा समन्वयक भूषण कविमंडल व डॉ. मनोज चोपडा आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.