आंदोलक शेतकऱ्यांशी दहशतवादयांप्रमाणे वागू नका – प्रशांत पाटील

0

चिखली, लोकशाही न्यूज नेटवर्क

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी पीक विमा, अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानभरपाई तसेच सोयाबीन कापूस भाव वाढ यासाठी आंदोलन पुकारले असता पोलीस प्रशासनाकडून तिव्र स्वरूपाचा लाठी हल्ला करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असल्याने रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी जाहिर निषेध व्यक्त केला आहे.

दि.११ फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथे आंदोलनादरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेतकरी बांधवांवर पोलीस प्रशासनाने गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल केले असून आंदोलनकर्त्यांवर कलम 309, कलम 353, कलम 171, कलम 147, कलम 148, कलम149, कलम 336, कलम 109, कलम 188, कलम 135 आदी स्वरूपाच्या कलमा द्वारे गुन्हे दाखल करून त्यांची अकोला येथे कारागृहात रवानगी केलेली आहे. वास्तविक बघितलं तर तुपकर हे शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत असतांना सूड भावनेने पोलीस प्रशासनाने जसे काही आंदोलन कर्ते म्हणजे नक्षलवादी, दहशतवादी आहेत अशा प्रकारची निंदनीय कारवाई आंदोलनकर्त्यासह शेतकरी बांधवांनवर करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडू नये असे प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांची शासनाकडे पीक विमा, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई या रास्त मागणीसाठी असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये व जे कार्यकर्त्ये आंदोलनात सहभागी नसतांना देखील त्यांच्या घरोघरी जाऊ सर्वत्र त्यांची आरोपी प्रमाणे चौकशी करत असल्याने भीतीपोटी बहुतांश कार्यकर्ते आप आपले फोन बंद करून घर दार सोडून पोलीस प्रशासनाच्या भीतीने इतरत्र पसार झालेले आहेत. किमान त्यांच्याशी तरी प्रशासनाने दहशतवादयाप्रमाणे वागू नका असे रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.