वैद्य प्र.ता. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रभा आयुर्वेद रथयात्रेचे आयोजन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

वैद्य प्र.ता. जोशी यांच्या समृतीपित्यर्थ संपूर्ण महाराष्ट्र “प्रभा आयुर्वेद रथयात्रेचे” आयोजन करण्यात येत आहे. (Organized “Prabha Ayurveda Rath Yatra” across Maharashtra in memory of Vaidya Joshi) ही रथयात्रा २ डिसेंबर रोजी तुळजापूर येथून सुरु होऊन ५ जानेवारी रोजी धुळे येथे समारोप होणार आहे.

दरम्यान ही रथयात्रा १४ डिसेंबर रोजी जळगाव येथे पोहोचून मुक्काम करेल, व १५ डिसेंबर रोजी जळगाव शहरात ही रथयात्रा अनेक ठिकाणी जाणार आहे. जळगाव येथे जिल्हा आयुर्वेद समूह या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करणार असल्याचे वैद्य नरेंद्र गुजराथी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. त्याच बरोबर या यात्रेत जिल्ह्यातील सर्व वैद्य सहपरिवार सहभागी होतील.

यावेळी ही रथ यात्रा १५ डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता सर्व वैद्य काव्यरत्नावली चौकात एकत्रित येऊन, 6.30 मिनिटांनी यात्रेला प्रारंभ होईल. यावेळी हवन-पूजन करण्यात येईल. यादरम्यान रथयात्रा ही राममंदिर येथे पोहोचल्यावर क.ब.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय महेश्वरी, सिव्हील सर्जन डॉ.नागुराव एस. चव्हाण यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ वैद्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

तसेच रथयात्रेच्या दिवशी १५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२.३० दरम्यान हॉटेल मोरोको येथे आरोग्य शिबीर घेण्यात येणार असून मोफत औषधोपचार देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी, वैद्य. नरेंद्र गुजराती, वैद्य. जयंत जहांगीरदार, वैद्य. जयदीपसिंघ छाबडा, वैद्य. उदय तन्ना, वैद्य. विकास चौधरी हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.