धक्कादायक; पाय घसरून विहीरीत पडल्याने युवकाचा मृत्यू…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील नाचणखेडा शेत शिवारातील विहीरीत पाय घसरून पडल्याने लोहटार येथील २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोहटार ता. पाचोरा येथील जयकिरण संतोष पाटील (२३) हा युवक २९ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. दरम्यान जयकिरण हा लघुशंकेसाठी नाचणखेडा शेत शिवारातील विहीरी जवळुन जात असतांना अंधारामुळे अंदाज न आल्याने अचानक पाय घसरून तो विहीरीत पडला. या घटनेबाबत ग्रामस्थांना कळताच त्यांनी जयकिरण यास विहीरीतुन बाहेर काढून तात्काळ पाचोरा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी जयकिरण यास मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत जयकिरण पाटील याचे पाश्चात्य आई, वडिल, एक भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here