अल्पवयीन मुलीचा विष प्राशनाने मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यावर झालेल्या अत्याचाराने ती गर्भवती झाली होती. गर्भवती अल्पवयीन मुलीने विषारी पदार्थ सेवन केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. या घटनेप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी येथील सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत अज्ञात आरोपीने तिच्यावर 16 मे 2022 च्या रात्री अत्याचार केल्याची घटना घडली होती. सदर घटनेनंतर पिडीत मुलीला तिच्या नातेवाईकांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीया महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. वैद्यकीय उपचारदरम्यान पिडीत अल्पवयीन मुलीचा मृत्यु झाला होता. मयत पिडीत मुलगी गर्भवती असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिका-यांनी दिल्याने बाल कल्याण समितीकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.

सदर घटनेच्या अकस्मात मृत्युच्या तपासानुसार व बाल कल्याण समितीच्या पत्रव्यवहारानुसार सत्य परिस्थिती समोर आली असतांना देखील मयत मुलीच्या मृत्युबाबत तिच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे सरकारतर्फे फिर्यादी होत पो.हे.कॉ. श्रावण गोंडू जवरे यांनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. सदर गुन्हा गु.र.न. 245/22 भा.द.वि. 376, पोक्सो कलम 4, 5 जे (2), 6 नुसार दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला फैजपूर उप विभागचे पोलिस उप विभागीय अधिकारी डॉ. कुणाल साळुंखे, पोलिस निरीक्षक शंकर शेळके आदींनी भेटी दिल्या. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक राहुल बोरकर करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.