पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे लोकमान्य टिळक यांना आदरांजली !

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

दिनांक १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पोदार इंटरनॅशनल स्कुलतर्फे  आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. शाळेच्या समन्वयिका मेघना राजकोटीया यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.

शाळेचे माध्यमिक शिक्षक शेखर लांडगे यांनी टिळकांच्या जीवनकार्याला उजाळा देत त्यांना लोकमान्य हे नाव कसे मिळाले ही माहिती विद्यार्थ्यांना दिली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच“ अशी गर्जना देत ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेविरूद्ध संघर्षाला प्रारंभ केला. उपस्थित विद्यार्थ्यांसमोर लोकमान्य टिळकांच्या प्रखर देशभक्तीचे वर्णन त्यांनी केले.

या प्रसंगी विराट राजेशिर्के  ३ री तील विद्यार्थ्याने टिळकांच्या महान कार्याला व समर्पणाच्या भावनेला वंदन केले. टिळकांच्या जीवनातील विविध प्रसंग वर्णानातून विद्यार्थ्यांनी देशभक्तांसाठी दर्शविलेल्या आदर व सन्मानाची भावना अधिक बळकट झाली. असे आपल्या भाषणातून सांगितले

शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ठ सदरीकरणासाठी त्यांचे कौतुक केले. शाळेचे उप-मुख्याध्यापक दिपक भावसार, पोदार जंबो किड्सच्या मुख्याध्यापिका उमा वाघ, वरिष्ठसमन्वयक हिरालाल गोराणे, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.