महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर, मोदींची मोठी घोषणा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबईत (Mumbai) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवरून संवाद साधला. तसेच महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

महाराष्ट्रात 2 लाख कोटींपेक्षा जास्त 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांवर काम सुरू आहे. तर काही प्रकल्प लवकरच सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी 75 हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी 50 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.

तसेच मोदी म्हणाले की, गेल्या आठ वर्षात 8 कोटी महिलां सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांना साडे पाच लाख कोटींची मदत देण्यात आली आहे. या ग्रुपशी जोडलेल्या महिला इतर महिलांनाही रोजगार देत आहेत. यातून महिलांचे सक्षमीकरण होत आहेत.

याशिवाय स्टार्ट अप, लघु उद्योगांना पाळबळ देण्यासाठी सरकार आर्थिक मदत करत आहेत. त्यामुळे तरुणांना आपलं कौशल्या दाखवण्याची संधी मिळेल. तसेच सरकारच्या प्रयत्नांमधून दलित, आदिवासी, महिलांना समान संधी उपलब्ध होत आहे.  केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर खर्च करत असताना त्यातून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतात. महाराष्ट्रात भविष्यात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.