कार्तिकी एकादशीस निघणारा भारतातील एकमेव श्रीरामरथ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दाही सरता वहन आली एकादशी मोठी मंग सावरला रथ झाली गावामंधी दाटी । 

जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावचे विद्यमाने कार्तिकी प्रबोधिनी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्य श्रीराम रथ यात्रेचे कार्तिक प्रबोधिनी एकादशी दि. ४ नोव्हेंबर २०२२, शुक्रवार या दिनी, आयोजन करण्यात आले आहे.  यासाठीची संपूर्ण तयारी झाली असून जळगाव नगरी श्रीराम रथोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे.

पहाटे ४.०० वाजता काकडारती प्रभु श्रीरामांच्या उत्सवमुर्तीस महाभिषेक सकाळी ७.०० वाजता महाआरती, सकाळी ७.३० ते ८.३० सांप्रदायिक परंपरेचे भजन. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी १०.३० वाजता श्रीराम रथाचे महापुजन, वंशपरंपरेने श्रीराम मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त व विद्यमान पंचम गादीपती ह. भ. प. श्री. मंगेशजी महाराज जोशी ( श्री अप्पा महाराजांचे पाचवे वंशज) यांचे शुभ हस्ते व शहरातील समस्त ब्रह्मवृंद मंडळी यांचे वेदमंत्र घोषात संपन्न होईल.

या शुभ प्रसंगी गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा व पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य, गिरीश महाजन, पालकमंत्री व वैद्यकीय प्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, अमन मित्तल, जिल्हाधिकारी जळगाव, एम. राजकुमार, जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक,  कुमार चिंथा, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजुमामा भोळे, खा. उन्मेष पाटील, मा. चंद्रकांत गवळी, अप्पर पोलिस अधिक्षक, जळगाव,  जयश्री महाजन, महापौर, जळगाव,  डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त जळगाव,  प्रविण महाजन, अतिरीक्त जिल्हाधिकारी, जळगाव, कुलभुषण पाटील, उपमहापौर, जळगाव, नामदेव पाटील, तहसिलदार,  अशोक जैन, जैन उद्योग समुह, जळगाव (अध्यक्ष, जैन उदयोग समुह ),  सुशील अत्रे ( विधिज्ञ) अध्यक्ष, ब्राह्मण सभा, जळगाव, सतिष मदाने अध्यक्ष, जिल्हा असोसिएशन बँक,  अनिकेत पाटील, चेअरमन, जळगाव पिपल्स बँक, अनिल राव, अध्यक्ष, जनता बँक, जळगाव, डॉ. अर्जुन भंगाळे, डॉ. केतकीताई पाटील, सुनिल महाजन, विरोधी पक्ष नेते,  नितीन लढ्ढा, माजी महापौर, जळगाव, विजय काबरा, अध्यक्ष पांजरापोळ,  खा. उल्हास पाटील, ललित कोल्हे,  गुलाबराव देवकर, विष्णु भंगाळे, बंडुदादा काळे, तसेच जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर रामभक्तांच्या उपस्थितीत तसेच श्रीराम मंदिर संस्थानचे समस्त विश्वस्त मंडळी, भरत अमळकर, भालचंद्र पाटील, अॅड. सुशील अत्रे, दादा नेवे, शिवाजी भोईटे, विवेक पुंडे रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, संजय चौधरी सदस्य, भानुदास चौधरी, विलास चौधरी, दादा नेवे, शिवाजी भोईटे, सुजित पाटील, दिलीप कुलकर्णी तसेच रथोत्सवाचे मानकरी सेवाधारी यांच्या उपस्थितीत प्रारंभ होईल.

वंशपरंपरेने ह. भ. प. श्री. मंगेशजी महाराजांचे हस्ते श्रीराम रथाची महाआरती होवून संस्थानतर्फे उपस्थित प्रमुख अतिथी व रथोत्सवाचे मानकरी सेवाधारी यांचा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर श्रीराम रथावर आरूढ होणारी प्रभू श्रीरामचंद्रांची उत्सवमूर्तीची आरती होवून रथावर मुर्ती विराजमान होईल. स्थावर गरूड, मारुती, अर्जुन, दोन घोडे, इ. मुर्त्या तसेच पुष्पहारांनी सजवलेल्या श्रीराम रथाच्या दिंडीस सोहळ्यास प्रभु श्रीरामांच्या जयघोषात प्रारंभ होईल. रथाचे अग्रभागी सनई, नगारा वादन, चौघडा, झेंडेकरी, बॅन्ड पथक, वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ, वावडदा, कुंवरस्वामी भजनी मंडळ वाघोड, व्यंकटेश भजनी मंडळ, देवपिंप्री, श्रीराम भजनी मंडळ, मेहरूण, तसेच आसपासचे खेडयावरील भजनी मंडळी, श्री संत मुक्ताबाईच्या पादुका असलेली पालखी व त्यामागे श्रीरामस्थ, असा भव्यदिव्य जलग्रामनगर दिंडी प्रदक्षिणा रथयात्रेस मिरवणुकीस सकाळी १२ वाजता श्रीराम मंदिर येथून प्रारंभ होईल.

रथप्रस्थानाचा मार्ग –

श्रीराम मंदिर, भोईटे गढी, आंबेडकर नगर तेली चौक, श्रीराम मंदिराचे मागील गल्लीतून, रथचौक, बोहरागल्ली, सुभाष चौक, सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम होवून श्री मरिमाता मंदिर, भिलपुरा मार्गे भिलपुरा येथील श्री संत अप्पा महाराजांचे परममित्र श्री संत लालशाबाबा यांची समाधी येथे श्रीराम रथाचे सेवाधारी रामसेवक माल्यार्पण करतील. बालाजी मंदिर, रथचौकात रथ रात्री बारा वाजता येईल. प्रभू श्रीरामांच्या उत्सवमुर्तीस पालखीत ठेवून वाजतगाजत श्रीराम मंदिरात आणण्यात येईल.

रात्री प्रभु श्रीरामांची आरती होईल. या रथोत्सवाकरिता अवघ्या महाराष्ट्राच्या विविध भागातून असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. प्रत्यक्ष पंढरीचे पांडुरंग जळगावी येतात अशी भाविकांची श्रध्दा आहे. वारकरी संप्रदायाचे थोर संत व श्रीराम मंदिर संस्थानचे मुळ सत्पुरुष संत अप्पा महाराज यांनी १७९४ साली हिंदू समाजातील १८ पगडजाती एकत्र करून हा रथोत्सव सोहळा प्रारंभ केला. आज १५० वर्षे झाली जळगावकरांच्या असंख्य भाविक नागरीकांच्या सहकार्याने हा रथोत्सवाचा नंदादिप अखंडपणे तेवत आहे.

या रथोत्सवाचे यशस्वीतेसाठी श्रीराम मंदिर संस्थान प्रमुख विश्वस्त विद्यमान गादीपती ह.भ.प. गुरुवर्य श्री. मंगेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थानचे विश्वस्त मंडळी भरत अमळकर, भालचंद्र पाटील, सुशील अत्रे, वसंत शिवाजीराव भोईटे, दादा नेवे, विवेक पुंडे व रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, दिलीप कुलकर्णी सदस्य भानुदास चौधरी, विलास चौधरी, संजय चौधरी, सुजित पाटील, पितांबर चौधरी, राजेंद्र काळे, दिगंबर खडके, मुकुंदा पाटील, अरूण मराठे, आशिष पाटील, दिलीप खडके, देवेश पाठक, देविदास बारी भास्कर चौधरी, मुकुंद धर्माधिकारी, नंदु शुक्ल, महेंद्र जोशी, प्रणव जोशी, विकास शुक्ल, मुकुंद शुक्ल, सुनिल शिंपी, सदाशिव तांबट, गणेश दायमा, जयेश पाटील, राजेंद्र जोशी, रमाकांत जोशी, पराग जोशी, विनायक जोशी, विनय जोशी, उदय बुवा, तानाजी बारी, केशव बारी घनश्याम चौधरी, दिलीप राजपूत, मधुकर चौधरी, योगेश कासार, संजय कोरके, सुनिल पाटील, यशवंत खडके, दिनेश धांडे, गजानन फडे, सिध्दांत फडणीस, राजू कोळी व समस्त श्रीराम भक्त, मानकरी, सेवेकरी या मंडळींनी परिश्रम घेतले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.